गावठी हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

यावल : तालुक्यातील आडगाव येथे गावठी हातभट्टीची दारू गाळणार्‍या एकावर पोलिसांनी कारवाई करीत 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीत पसार झाला असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीत पोलिसांना पाहताच पसार
आडगाव, ता.यावल येथे पालक नदीच्या पात्रात संजय निंबा पवार हा गावठी हातभट्टीची दारू गाळत असतानाच सहायक फौजदार अजीज शेख, गणेश ढाकणे यांनी छापा टाकला. 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान संजय पवार हा पळून गेला. संशयीताविरोधात यावल पोलिसात सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.