गावडे ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0

आकुर्डी (प्रतिनिधी) – गावडे कन्स्ट्रक्शन ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 204 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर येथील गावडे बिझनेस सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी महेश ढोले, शंकर नरवडे, संदेश तनपुरे, विराज गावडे, मोहित गावडे, मनोहर मोडक, निखिल काळभोर, शहाजी कांबळे, रुपेश गोपाळे, बसवराज हुगर, संतोष मराठे, संतोष चौधरी, किरण बुक्के, निखिल वाघोले, दिलीप पाटील, आशा कांडेकर, माधुरी कदम आदींनी सहकार्य केले. या रक्तदान शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीचे सहकार्य लाभले. गावडे कन्स्ट्रक्शन ग्रुपतर्फे गेल्या 6 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.