गावपातळीवर स्वच्छाग्रही करणार कोरोनाबाबत जनजागृती: पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

0

जळगाव: सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. भारतात मोठा प्रादुर्भाव आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होत असल्याने जनजागृतीची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे संपूर्ण जिल्ह्यात गावागावात कोरोनाविषयी जनजागृती केली जाणार आहे. स्वच्छाग्रही गावागावात कोरोना विषयी जनजागृती करणार आहे. याबाबत राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी स्वच्छाग्रहिंशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डीगंबर लोखंडे आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढल्याने जिल्ह्याचे स्थान आता रेड झोनमध्ये आहे. प्रादुर्भाव अधिकच वाढत चालल्याने जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करण्यात आले.

2004 स्वच्छाग्रहींना गावात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. गावात आलेल्यांचा तिरस्कार न करता स्वछतेविषयी मार्गदर्शन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.