मुंबई । क्रिकेटमध्ये नवे बदल आणणार्या लोढा समितीच्या शिफारसींमूळे अनेक बदल घडत आहेत. अजून पूर्णपणे या शिफारसी लागू झाल्या नसल्या तरी एवढ्यापासूनच काही माजी खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहे. आता लोढा समितीच्या शिफारसीनुसार बीसीसीआयमध्ये एक नवा नियम येणार आहे. यानुसार जे माजी क्रिकेटर बीसीसीआयशी जोडले गेले आहेत ते कोणते वेगळे काम करु शकत नाहीत. जर बीसीसीआयने या शिफारसी लागू केल्या तर गावस्कर यांच्यासहित अनेक माजी खेळाडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यात संजय मांजरेकर, मुरली कार्तिक या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचा समावेश आहे. बीसीसीआयशी संबंधित असलेले लोक एकच काम करु शकतात असे त्यावेळी सांगितले जात होते.त्यानंतर बोर्डाच्या आदेशानुसार, सुनील गावस्कर यांनी स्वत:ची प्लेअर मॅनेजमेंट कंपनी बंद केली होती. एवढ्यातच गावस्कर यांच्या अडचणी संपल्या नाहीत. गावस्कर यांच्यासहित संजय मांजरेकर, मुरली कार्तिक, हर्षा भोगले ही मंडळी समालोचक म्हणून तसेच एक्सपर्ट कॉलम लिहिण्याचे काम करतात. पण नव्या नियमानुसार या दोघांमधील एकच काम त्यांना निवडावे लागणार आहे.
हा नियम हिंदी समालोचकांसाठी लागू नसणार आहे. त्यामूळे स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करणार्या व्ही व्ही एस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग यांच्यावर या नियमांचा काही परिणाम होणार नाही. कारण या दोघांचा करार बीसीसीआय सोबत नसून स्टार स्पोर्ट्ससोबत आहे.त्यामूळे हे दोन्ही माजी क्रिकेटपटू त्यांचे कॉलम यापूढेही लिहित राहू शकतील.
काहींनाच सूट
मीडिया वृत्तानुसार 24 नोव्हेंबरला अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ कमिटीची बैठक झाली होती. बीसीसीआयचा त्यांच्या समालोचकांसोबत झालेल्या करारावर यावेळी चर्चा झाली. यामध्ये काही समालोचकानांच पुरस्कृत कॉलम लिहिण्याची सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआय आता माजी खेळाडू, समालोचक हे एक्सपर्ट कॉलम लिहू शकतात का यावर विचार करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या ओम्बुड्समॅन याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सुनिल गावसकर हे समालोचन करण्यासोबत क्रिकेट पुरस्कार आणि रेटिंग देणार्या संस्थेशी जोडले आहेत.