रावेर । ज्या गावात जाती, धर्मात एकमेकांत तेढ असेल अशा गावाचा विकास व्यवसाय ठप्प होतो. गावाच्या प्रगतीसाठी एकोपा व शांततेची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी व्यक्त केले. रावेर पोलीस स्टेशन व मुस्लिम पंच कमिटी यांच्यातर्फे रमजाननिमित्त आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार शिरिष चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, नगराध्यक्ष दारा मोहंमद, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तहसीलदार विजयकुमार ढगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक प्रल्हाद महाजन, वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, डॉ. संदिप पाटील, अॅड. एम.ए. खान, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे
उपस्थित होते.
शांतता भंग करणार्यांवर कठोर कारवाई करणार
यावेळी जिल्हा पोली अधिक्षक कराडे म्हणाले की, गावाची शांतता कोणी भंग करित असेल व कायदा हातात घेत असेल तर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करेल. शहरातील नागरिकांनी माणुसकी जपावी. पोलिस व प्रशासन आपल्यासाठी कार्य करुन कर्तव्य बजावत आहे. यावेळी माजी आमदार शिरिष चौधरी, कपिल महाराज, मौलाना गयास उद्दीन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केले. सुत्रसंचालन दिलीप वैद्य यांनी तर आभार फौजदार दिपक ढोमणे यांनी मानले. यांची होती उपस्थिती यावेळी नगरसेवक अॅड.सुरज चौधरी, आसिफ मोहंमद, सादिक शेख, अनिल अग्रवाल, अॅड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील, अॅड. एस.एस. सैय्यद, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, डॉ. सुरेश पाटील, गयास शेख, युसुफ खान अय्युबखाँ पठाण यांसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.