गावात येणार ग्रामस्थांची सत्ता

0

पुणे । स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाभरातील गावागावांत ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यंदा दिसून आले. काही ठिकाणच्या ग्रामसभांमध्ये वादावादीचे, हाणामारीचे प्रसंग घडले असले तरी ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. बहुतेक गावातील ग्रामसभांना महिलांची हजेरी मोठी होती. या ग्रामसभांमधून विकासकामांबाबतचे मुद्दे ठोसपणे मांडून त्यानुसार पाऊल उचलण्याबाबचे ठरावही झाले आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामसभा कात टाकत असल्याचे आढळत आहे. यावरून गावात आता ग्रामस्थांची सत्ता येणार असल्याचे दिसते. यातून ग्रामपंचायतीमध्ये ठाण मांडून बसलेल्या काही ठराविक मंडळींची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. शिवाय भविष्यातील अध्यक्षीय पद्धतीने निवड झालेल्या सरपंचाविषयी व्यक्त केली जाणारी एकाधिकारशाहीची भीती कुचकामी ठरणार आहे.

निवडणूक प्रतिष्ठेची
यापूर्वी ग्रामसभा आणि तिचे महत्व याविषयी पाहिजे तितकी जागरुकता नव्हती. त्यामुळे यापूर्वी मिळणारा निधी व स्थानिक उत्पन्न तुटपुंजे यामुळे सरपंच व सदस्य पदे प्रतिष्ठेसाठी मिळवली जायची. 13-14 व्या आयोगानुसार मोठ्या प्रमाणात वित्त व अधिकार ग्रामपंचायतीना मिळू लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. तसेच याची आर्थिक गणिते लक्षात घेऊन लढवल्या जात आहेत.

सरपंचांच्या स्वविकासाला लगाम
पर्यायाने जिंकलेल्यांचा एकहाती कारभार करून माया जमवणे, हा एककलमी कार्यक्रम सुरु झाला. तर हरलेल्यांनी तसेच माजी सदस्यांनी ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवायला सुरुवात केल्याने मनमानी सुरू होऊन पाच वर्षे पाच सरपंच संगनमताने सुरू होऊन स्वविकास सुरूच ठेवला. या गोष्टींना आता ग्रामसभांमुळे लगाम लागला आहे. तसेच यातून ग्रामस्थांची सत्ता भविष्यात सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ती वाढत्या ग्रामसभांच्या प्रतिसादामुळे हे होत आहे.

ग्रामस्थांमध्ये जनजागृती
आता अध्यक्षीय पद्धतीने सरपंच निवड, तीही पाच वर्षाने होणार असल्याची शासनाकडून घोषणा झाल्याने काही नेत्यांनीही अशा निवडीबाबत भीती व्यक्त केली. यामधून कारभार पूर्णपणे एकाच्याच हाती केंद्रीत होऊन होऊन भष्टाचार वाढीस लागेल. अशा प्रकारची वक्तव्य येऊ लागल्याने जनतेच्या मनात हीच वाढती भीती निर्माण झाल्याने विकासकामे कशी होणार? याची चिंता व्यक्त होऊ लागली. याच चिंतेला उत्तर म्हणून ग्रामसभा आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामधून मिळत आहे. नेमकी हीच बाब ग्रामस्थांकडून दुर्लक्षित होत होती. यापूर्वी ग्रामसभांना उपस्थिती नसायची मात्र, आता जनजागृतीमुळे ग्रामसभेला उपस्थिती लावण्यात ग्रामस्थ पुढे दिसत आहेत. यातून ग्रामस्थांनी ग्रामस्थांसाठी चालवलेली ग्रामपंचायत या पद्धतीने ग्रामसभा होऊन विकास होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

येत नाही.