जळगाव : ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची असते. यामुळे गावा तेथे रस्ता हे माझे स्वन्प आहे. ते स्वप्न पूर्ण रण्यासाठी मी नेहमी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील नांदेड-साळवा-साकरे-दहिवद व प्रजिमा 47 ते निंभोरा या रस्त्यांच्या कामांच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, धरणगावचे नगराध्यक्ष सलिम पटेल, पंचायत समिती सभापती भगवान मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार संचालक रोहिदास पाटील, डी.ओ.पाटील, सरपंच राजेंद्र कोळी, चेतन पाटील आदी होते.
याप्रसंगी बोलतांना ना. पाटील पुढे म्हणाले की, साकरे गावासाठी तापी नदीवरुन कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजुर करणार असलयाचे वचन दिले. तर निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या कामकाजाचे कौतुक करुन शाळेला संगणक देणार असल्याचे सांगितले. या परिसरात मंजुर झालेल्या रस्त्यांमध्ये नाबार्डमधुन नांदेड-साळवा-साकरे-दहिवद रस्तामधील साकरे-निमझरी रस्त्यासाठी 70 लाख रुपये व निमझरी ते साकरे साठी 44 लाख रुपये, तर पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून प्रजिमा 47 ते निंभोरा रस्ता डांबरीकरणासाठी 38 लाख 81 हजार या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी नागरिकांची प्राधान्य क्रमाने मागणी होती. या मागणीची तात्काळ दखल घेवून राज्यमंत्र्यांनी स्वत:या कामांचे भूमिपूजन केले.यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व तालुका प्रमुख गजानन पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपसरपंच आत्माराम भिल, मांगिलाल सोनवणे,सोनु नाईक, हेमराज भोई, कृष्णा पाटील, रोहिदास सोनवणे, वामन पाटील, भाऊसाहेब पाटील, पंढरीनाथ पाटील, सुधाकर पाटील, शरद पाटील, जे.बी.पाटील, एकनाथ पाटील, दिपक सोनवणे, प्रमोद पाटील, भगवान महाजन, मोतीराम पाटील यांच्यासह प्रत्येक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.टी. पाटील तर आभार गोकुळ पाटील यांनी मानले.