शिरूर । आदर्श सांसद ग्राम करंदी (ता. शिरूर) येथे प्रतिवर्षी 500 झाडांची लागवड केली जाते. यासाठी सांसद आदर्श ग्राम योजनेतून 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात येते. तसेच गाव संजीवनी उपक्रम सुरू करण्यात आल्याचे उपसरपंच चेतन दरेकर, ग्रामविकास अधिकारी आर. आर. राठोड यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सरंक्षण जाळ्यासह, ठिंबक योजनाही सुरू करण्यात आली आहे. गावात प्रवेश करणार्या रस्त्याच्या दुतर्फा या 500 झाडांची लागवड करण्यात आली आहे. अद्यापही या भागातील डोंगरावरील महादेव मंदिर परिसर व जानपिरबाबा मंदिर रस्त्यालगतही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.