वरणगाव। आयुध निर्माणी वसाहतमधील गिताई भजनी महीला मंडळाने भजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन मिळालेल्या रकमेचे शालेय वस्तु चिंचोल मेहुण येथील यज्ञेश्वर आश्रमातील गरजु विद्यार्थ्यांना वितरण करून आदर्श उपक्रम राबविला आहे. आश्रमाचे अध्यक्ष हभप शारंगधर महाराज यांच्या उपस्थितीत वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, पेन व कपडे या वस्तुचे वितरण संपन्न झाले.
याप्रसंगी स्मीता भोळे, ज्योती नेहेते, रजनी महाजन, माधुरी पाटील, राधा वराडे, संगीता चोपडे, पुष्पा बर्हाटे, सुनंदा सरोदे, नंदा चौधरी, सविता भोळे, वंदना पाटील आदी महीला उपस्थीत होत्या. भजनी मंडळ डोहाळे कार्यक्रम, नामकरण विधी, वाढदिवस आदी कार्यक्रमात भजन करतात व मिळालेल्या रकमेचे गरजु मुलांना साहीत्य वितरीत करतात या पूर्वी या मंडळाने खंडवा आश्रमात शालेय साहीत्य दिले आहे. या उपक्रमाबद्दल मंडळाचे परिसरात अभिनंदन होत आहे.