भुसावळ । येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश चौधरी यांचे चिरंजिव गितेश चौधरी याने 2016-17 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या सीईटी परिक्षेत 181 गुण तसेच जेईई मेन परिक्षेत 189 गुण तर महाराष्ट्र बोर्ड परिक्षेत 82.23 गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.