गिफ्ट खरेदीला आले अन् मुर्ती चोरून गेले!

0

जळगाव । गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट गॅलरीत बर्थडे गिफ्ट खरेदीचा बनाव करीत गाय-वासरूची आर्टीफिशल मुर्ती चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यावेळी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाप-लेक कैद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही वाघनगर येथील असल्याचे समजते. याप्रकरणी दुकान मालकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ओंकारेश्‍वर मंदिर परिसरातील रहिवासी नमिश मनसुकलाल पंचमिया यांची गोलाणी मार्केटमध्ये जलाराम या नावाने गिफ्ट गॅलरी आहे. काल सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या गिफ्ट गॅलरीत बाप-लेक आले. यावेळी नमिश हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांचा मुलगा मित हा गॅलरी (दुकान) सांभाळत होता. बाप-लेकाने मित याला बर्थडे गिफ्ट आहेत का असे विचारून दाखविण्यात सांगितले. मित ने गिफ्ट दाखवल्यानंतर त्यांनी गाय-वसरूची मुर्ती आहे का विचारले. मुर्ती दाखविल्यानंतर पसंत आली नसल्याचा बनाव करत दोघांनी फाटो फ्रेमची मागणी केली. यानंतर दुकानातील गिफ्ट पाहण्यात बाप-लेक व्यस्त झाले. यानंतर मित हा त्या बापाशी बोलण्यात गुंग होताच लेकाने साडे आठशे रूये किंमतीची गाय-वासरूची आर्टीफिशिअल मुर्ती गुपचुप पिशवित टाकली. यानंतर गिफ्ट पसंत न आल्याचा बनाव करत दुकानातून काढता पाय घेतला. काळी वेळानंतर मित हा मुर्ती ठेवलेल्या रॅकजवळ आल्यानंतर त्याला चार मुर्तीपैंकी एक मुर्ती दिसून आली नाही. चोरी झाल्याचा संशय येताच त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असत त्याला गिफ्ट खरेदीसाठी आलेल्या बाप-लेकापैकी लेकाने मुर्ती हळूच उचलून पिशवीत टाकून चोरी केल्याचे दिसून आले. मित याने लागलीच त्यांचे वडील नमिश यांना घटना सांगितल्यानंतर नमिश यांनी लागलीच सीसीटीव्ही फुटेज मोबाईलमध्ये घेवून त्यांच्या एका व्हॉट्स अ‍ॅप गु्रपमध्ये टाकले. त्यात त्यांना हे बाप-लेक वाघनगर येथील असल्याचे समजले. मंगळवारी सकाळी नमिश यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली आहे.