गिरडगावजवळ धावती ओमनी पेटली ; प्रवासी बचावले

0

यावल- बर्‍हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव गावाजवळ चोपड्याकडे प्रवासी वाहून नेत असलेल्या ओमनीने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. ओमनीने एकदम पेट घेताच अवघ्या काही वेळात ती खाक झाली तर सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. यावल-चोपडा रस्त्यावरील गिरडगाव गावाजवळ यावलकडून प्रवासी घेऊन जात असलेली यावल येथील रेहानखान यांच्या मालकीची ओमनी (एम.एच.19 ए.एफ.5987) हिने अचानक पेट घेतला. वाहनात पाच प्रवाशांसह वाहन चालक मिळून सहा जण होते. प्रवाशांना सुरक्षित परीसरातील नागरीकांसह अग्निशमन बंबाने आग विझवली. घटनेचे वृत्त कळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.