यावल- चोपड्याकडून यावलकडे येणारा कंटेनर (क्रमांक आर. जे. 09 जी. बी. 5798) घेवून चालक दिनेश बाबुराम पाल (25, रा.निरोत्तमपूर बदायु, उत्तरप्रदेश) हा येत असताना सायंकाळी सायंकाळी गिरडगाव जवळ रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या बेतात वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला कलंडला. त्यात चालक जखमी होवून वाहनाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी गिरडगावचे पोलिस पाटील अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहे.