गिरडगाव जवळ ओमनी दुचाकीचा अपघात

0

जळगाव। यावल तालुक्यातील गिरडगाव जवळ शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास प्रवाशी वाहतुक करणार्‍या ओमिनी व दुचाकीचा अपघात घडला यात एक ठार झाला असून एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अन्य जखमींवर किनगावात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर असलेल्या गिरडगाव जवळ शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास प्रवाशी वाहतुक करणारी ओमिनी क्रमांक एम.एच.19 वाय. 5109 ही यावलकडून चोपड्याकडे जात होती तर चोपड्याकडून यावलकडे येणार्‍या दुचाकी क्रमांक एम.पी. 46 एम.जे. 2485 यांच्या भिषण अपघात घडला यात दुचाकी स्वारच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन तो जबर जखमी झाला अपघात स्थळीच तो बेशुध्द होता.

किनगाव केंद्रात प्राथमिक उपचार
108 क्र.च्या रुग्णवाहिकेतुन जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. त्याचे नाव कळू शकले नाही तर ओमिनीतुन प्रवास करणारे मिलींद आसाराम सोळुंके व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा पवन सोळुंके(वय 3) रा. चिंचोली ता. यावल हे देखील जखमी झाले तर इतर चार जणं देखील अपघातात जखमी झाले सर्व जखमींना किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.अनिल पाटील, रज्जाक देशपांडे,भारती सोनवणे, संजय तडवी, गुड्डु तडवी यांनी प्राथमिक उपचार करून तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार्थ दाखल केले यातील दुचाकी चालक हा मध्य प्रदेशातील असुन त्याच्या सह सोळूंके पिता,पुत्र जखमी आहे अपघाताची माहिती गिरडगाव पोलिस पाटील अशोक पाटील यांनी पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांना दिले असता तात्काळ घटनास्थळी सपोनि योगेश तांदळे पथकासह दाखल झाले.