गिरड येथे जेडीसीसी बँकेतर्फे एटीएम कार्ड वाटप

0

भातखंडे। भडगाव येथून जवळच असलेल्या गिरड येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या वतीने खातेधारकांना एटीएम कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वत्र राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका देखील ह्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याने जिल्हा बँकेने देखील खातेदारांसाठी एटीएम कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या शाखेतून सर्व प्रथम भातखंडे येथील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक बी.एन.पाटील यांना एटीएम कार्ड देऊन ह्या सुविधेची सुरुवात केली आहे.

बँकेअंतर्गत भातखंडे, अंतुर्ली, गिरड, मांडकी, अंजनविहिरे आदी गावातील खातेदारांना कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बाबूलाल अर्जुन पाटील, रामकृष्ण मुरलीधर पवार,शिपाई, जितेंद्र दिलीप सोनवणे हे होते.