शेतकर्यांमध्ये आनंद ; गिरणा काठावरील गावांना होणार लाभ
जळगााव : रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून दोन हजार क्यूसेस आवर्तन सोडण्यात आल्यानंतर गिरणा काठावरील शेतकर्यांमध्ये आनंद पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. चाळीसगावसह भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर आदी तालुक्यातील शेतकर्यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले तर धरणाचे दोन दरवाजे काही मीटर अंतराने उघडण्यात आल्याचे एरंडोल पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस.पी.ठाकरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.