जळगाव । जिल्ह्यातही अनेक जीर्ण पुले असून पावसाळ्यात प्रवासासाठी हे पुल धोकेदायक ठरत आहे. पावसाळा सुरु झाला असून अद्यापही जिल्ह्यातील पुलाची दुरुस्ती झालेली नसल्याने पुले जीवघेणे ठरत आहे.
जळगाव शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बांभोरीजवळील पुलाचे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करण्यात आल्याने पिलर उघडे पडल आहे तसेच पुलाचे कठडे वाकले असून पुल कधी कोसळेल याचा नेम नाही प्रशासनाने याकडे लक्ष देण्याचे गरज आहे. अन्यथा ’गिरणाईचे सावित्री’ होण्यास वेळ लागणार नाही. मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटल्याने मोठी दुर्घटना झाली होती. राज्यपरिवहन महामंडळाचे दोन बस या दुर्घनेत वाहून गेल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली. या दुर्घटनेत 42 निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना अजही ताजी आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने राज्यभरातील जीर्ण पुलाची माहिती संकलीत करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ताचे देखभाल दुरुस्ती करण्यात येत असते. राज्यातील सर्व जीर्ण पुलाची दुरुस्तीचे आदेश मागील वर्षी देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील एकही पुलाचे काम करण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील अनेक पुल हे धोकेदायक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असल्याने पुल बांधकामाचा भराव घसरत चाललेला असल्याने दुर्घनेची शक्यता आहे.
पुलावरुन अवजड वाहतुक
जळगाव धुळे हा राष्ट्रीय महामार्ग गुजराथ, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांना जोडतो. देशभरातुन या महामार्गावरुन वाहतुक होते. बांभोरी येथील पुल जीर्ण होत आल्याने अपघाताची शक्यता आहे. गिरणानदीतुन होणारी वाळू वाहतुक याच मार्गाने होत असते. तसेच अनेक अवजड वाहनाची वाहतुक या पुलावरुन होत असल्याने प्रशासनाने पुल दुरुस्तीसाठी प्रयत्न करायला हवे. असून या महामार्गवरुन गुजराथसाठी वाहतुक होत असते.