चाळीसगाव- तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पुलावरुन शनिवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास पुलाचे कठडे तोडुन (जी.जे. ३२ टी. ९९१२) हा ट्रक खाली कोसळल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला तर क्लीनर जखमी झाला आहे. त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रात्रीच्या ट्रक उलटा पडल्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. सकाळी ९ वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील कामकाज मेहुणबारे पोलीस करीत आहेत