गिरणा परिसरात कानबाई मातेचे भक्तीभावात विसर्जन

0

चाळीसगाव । तालुक्यातील गिरणा परिसरात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज गावागावातील नदी किनारी असलेल्या मानाच्या ठिकाणी तीर्थावर सोमवारी कानबाई मातेला भक्तिभावाने मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले

नागपंचमी नंतरचा पहिल्या रविवारी स्थापना
गेल्या शनिवार पासून कानबाई मातेचा उत्सव सुरू झाला होता विशेषतः गिरणा परिसरात ब्राम्हण, वाणी, मराठी, सनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार, तेली, सारख्या अनेक कुळांची कुलदेवता असलेली कानबाई मातेचा थाट घरी सजविला जातो, तरी रविवारी दुपारी स्थापना करण्यात आली वहिगायन व रात्र जागरण केल्या नंतर सोमवारी ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले

आधुनिक स्वरूप झाले प्राप्त
पूर्वीच्या काळी कानबाई उत्सवात रात्री परिसरातील महिलांना हळदी कुंकू साठी बोलाविले जाते. आता तर मिरवणुकीत वह्या गायकाचा स्वरचित गाणे म्हणत मिरवणूक काढली जाते मात्र आधुनिकते वळण्यार्‍या समाजाने आता काळाच्या ओघात बॅण्ड तर काही हशी मंडळी तर डीजेणच्या तालावर कानबाईचे गाणे वाजवून महिलां फुगड्या खेळत, डोक्यावर कलश व कानबाईची आरास घेऊन नदीकिनारी असलेल्या तीर्थावर नेतात कानबाई मातेची आकर्षक आरास करून अहिराणी संस्कृती यानिमिताने जतन केली जाते आहे

यंदा पाऊसाने उत्साहात भर
कानबाई मातेच्या विसर्जन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात गिरणा परिसरात नदी ना पाणी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह वाढला होता ग्रामीण भागात गेल्या 5-6 दिवसापासूनच्या पाऊसाने तसेच कानबाईच्या रोट निमिताने गावी आलेले भाऊ बंद एकत्र आल्याने दुहेरी योग जुळून आला होता परिणामी अनेक ठिकाणी भरपाऊसात कानबाई मातेला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.