पाचोरा । भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने पाचोरा व भडगाव तालुक्याच्या सिंचन प्रकल्पामध्ये पाणीसाठा झालेला नाही. शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी गिरणा धरणातून आवर्तन दोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांची भेट घतली. आमदारांच्या मागणीवरून आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले. पावसाळा सुरु होऊन दोन ते अडीच महिने ओलांडले आहे. या काळात शेती पुरक पाऊस पडत नसल्याने थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे. दमदार स्वरपाचा पाऊस झाला नसल्याने भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या भागविणार्या पाचोरा- भडगाव तालुक्यातील लहान मोठे सिंचन प्रकल्पात पाणी साठा झालेल नाही.
जिल्हाधिकार्यांशी आमदार किशोर पाटील यांची चर्चा
सर्वच प्रकल्प निरंकावस्थेत आहे. अशा परिस्थितीत पाचोरा व भडगाव ह्या शहरात दहा ते पंधरा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊन पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमिवर मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोररराजे निंबाळकर यांची भेट घेऊन शेती व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत त्यांचेशी चर्चा केलव व गिरणेतून आवर्तन सोडण्याची मागणी केली. आमदारांच्या मागणीवरून जिल्हाधिकार्यांनी टंचाई निवारणार्थ पाटबंधारे विभागाला गिरणेतुन आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहे. यावेळी आमदारांसोबत पाचोरा- भडगाव तालुक्यातील जिल्हा परीषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.