नाशिक- जलसंपदामंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे. जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत. दरम्यान आज दुपारी त्यांच्या गाडीचा ताफा सटाणा येथे अडविण्यात येऊन त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष किशोर कदम, नगरसेवक काकाजी सोनवणे, राहुल पाटील आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाजन यांना काळे झेंडे दाखविले.