गिरीश महाजन यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा

0

जळगाव । दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नसमारंभात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीसह पक्षातील इतर पक्षश्रेष्टींनी ज्या पद्धतीने माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा त्याच पद्धतीने त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा घेवून त्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतिश पाटील यांनी पत्रपरीषदेत केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी रविवारी दुपारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठकीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, अल्पसंख्यांकचे सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार डॉ. पाटील पुढे म्हणाले की, दाऊदच्या नातेवाईकाला लग्नास जलसंपदामंत्री ना. महाजन यांनी लग्नसमारंभात हजेरी लावल्याचा आम्ही पक्षाचे सर्व श्रेष्ट नेत्यांसह निषेध व्यक्त करीत आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरही यापुर्वी अशाच पद्धतीचे अरोप करण्यात आले होते. तर ना. महाजन यांच्यासारख्या जबाबदार नेता दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला कशी लावू शकतो. दुसरी गोष्ट शिवसेनेकडून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत भगवा सप्ताह पाळला जात आहे. मात्र सत्तेत असलेल्या पक्षानेच असे उपक्रम राबवित आहे हे जनतेचे दुदैव आहे. सेना सत्तेत सहभागी असतानाही सरकारविरूद्ध आंदोलन करते. सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सहकारचेच राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

आमदार गोटेंच्या शिवीगाळ प्रकरणी निषेध
माजी पालकमंत्री देवकर म्हणाले की, भाजपातर्फे शिवार संवाद अभियान राबविले जात आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार अनिल गोटे यांनी शेतकर्‍यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. मुळात आमदार गोटे शेतकरी नाही, त्यांना कोणी कामाचा जाब विचारला तर राग येतो आणि मग बोलण्याचा संयम सुटतो. काही शिवारात खासदार रात्री शेत शिवारात पाहण्यास गेले. त्यांनी नक्की काय पाहिले असा सवाल केला. नाशिक जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाच्या संचालकांशी पालकमंत्री ना. महाजन यांनी मुख्यमंत्री यांची भेट घालवून दिली. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कर्ज माफी होत नसेल तर कर्ज तरी उपलब्ध करून द्या अशी मागणी गुलाबराव देवकर यांनी केले आहे.