गिरीश महाजन यांनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

0

सोयगाव । तालुक्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन बालिकेचा 13 जुलै रोजी निर्घुन हत्या करण्यात आली. हत्येतील संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केली. पिडीतेच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी पिडीत कुटुंबीयांच्या बाजूने सरकारी वकील म्हणून जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

याप्रकरणातील अटक झालेली आरोपींची कसून झाडाझडती घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असून जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक माथुर यांच्याकडून माहिती घेतली आहे. पिडीतेच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.