गिर्यारोहक डॉ. नारखेडेंना ‘बेस्ट ट्रेकर्स अवार्ड’ प्रदान

0

जळगाव। जगप्रसिद्ध शिखर माऊंट ऐवरेस्ट अन्नापूर्णा, काला पत्थर, लेह-लडाख आदी शिखरमालांना गवसणी घालणारे खान्देशातील गिर्यारोहक डॉ. विलास नारखेडे यांना यमुना फौऊंडेशन या क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्थतर्फे ‘बेस्ट ट्रकर्स’ पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले.

विविध हिमालयीन मोहिमांचे गिर्यारोहण, विद्यार्थी, युवकवर्गांत गिर्यारोहणाची आवड निर्माण करणे, लेखन, निर्मिती, साहसी खेळ, प्रशिक्षण व मार्गदर्शन, गडकिल्यावरील चढाई व संवर्धनासाठी सांघिक प्रयत्न करणे, अडथळे व संकट आदी गिर्यारोहणात भरीव कामगिरी करण्याच्या प्रयत्नाबद्दल सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच यावेळी डॉ. नारखेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंतर करण्यात येत आहे.