गीतगायन, पारंपारिक पोशाख स्पर्धेने वेधले लक्ष

0

फैजपूर । येथील धनाजी नाना महाविद्यालयात पुणे विद्यापीठाने दिलेल्या मान्यतेचे औचित्याने 9 फेब्रुवारी हा वर्धापन दिवस आणि वार्षिक स्नेहसंमेलन यांच्या निमित्ताने विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये नृत्य, गीतगायन, पारंपारिक पोेशाख स्पर्धा घेण्यात आल्या.

स्पर्धांनी भारावला महाविद्यालयाचा परिसर

शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या महाविद्यालयाच्या वर्धापन दिन औचित्याने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांंस्कृतिक, क्रीडा आणि इतर स्पर्धांच्या माध्यमातून अष्टपैलूत्व सिध्द केले. प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी नुकत्याच सेवेत रुजू झालेल्या नंदुरबार येथील प्रा. शेरसिंग पाडवी या तरुण प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वक्तृत्व, वादविवाद, स्वरचित्त, काव्यवाचन, निबंध, सलाद डेकोरेशन, मेहंदी, केशभुषा, रांगोळी आदी स्पर्धांनी महाविद्यालयाचा परिसर भारुन गेले. त्यातच पारंपारिक दिवस, साडी डे आणि टाय डे मुळे विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखासोबतच मनमोहक वेशभुषेने उपस्थितांची दाद मिळविली. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा.डॉ. सागर धनगर, स्वरचित काव्य स्पर्धेसाठी प्रा.डॉ. सतिश पाटील, निबंध स्पर्धेसाठी प्रा. शिवाजी मगर, विविध स्पर्धेसाठी डॉ. सविता वाघमारे यांनी चोख नियोजन केले. परिक्षक म्हणून डॉ. राजश्री नेमाडे, प्रा. विजय सेानजे, प्रा. विवेक महाजन, प्रा. सागर धनगर, डॉ. कल्पना पाटील, प्रा. लता पाटील, डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ. जगदिश पाटील यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. राजेंद्र राजपूत, डॉ. गोपाळ कोल्हे, डॉ. ए.के. पाटील, शेखर महाजन यांनी परिश्रम घेेतले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी केले.