गीतरामायण श्रवनाने स्वामीभक्त मंत्रमुग्ध

0

चिंचवड : येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी जयंती उत्सवात स्वरसंवादिनी प्रस्तुत गीतरामायण सादर करण्यात आले. रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली. गीतरामायणाच्या पारंपरिक पद्धतीनुसार राम-कथा निरूपण करून ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘चला राघवा, ‘जय गंगे जय भागिरथी, ‘दैव जात, दुःखे भरता, ‘सेतु बांधा रे सागरी’ अशी गीतरामायणातील गाणी सादर करण्यात आली.

यांनी केली साथसंगत
या कार्यक्रमात प्रणव कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, घननीळ पोतदार, शांभवी पोतदार यांनी गायन सेवा केली. तबला- धनंजय शाळिग्राम, व्हॉयलीन- रवी शिधये, सिंथेसायझर- तेजस चव्हाण, संवादिनी- प्रिया घारपुरे, तालवाद्य- सागर चव्हाण, निवेदन- शैलेश महामुनी यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचा शेवट ‘गा बाळांनो श्रीरामायण’ या गीताने करण्यात आला. या कार्यक्रमास मठाचे विश्वस्त मंडळ, ज्येष्ठ संगीतकार व गायक मधू जोशी यांच्यासह रसिक व स्वामीभक्त उपस्थित होते.