‘गीतांजली’चा डबा रूळावरून घसरला : तीन रेल्वे गाड्या धावल्या उशिराने

भुसावळ : काटेपूर्णा रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसचा जनरेटर डबा मंगळवारी सकाळी 11.15 वाजता रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली होती. अपघातग्रस्त डबा बाजूला करण्यासाठी तीन तास लागले. यामुळे डाऊन मार्गावरील अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस दीड तास, सुरत-पुरी अर्धा तास उशिराने धावली. अप मार्गावरील हटिया-पुणे एक्स्प्रेस बडनेराजवळ तीन तास थांबवली होती. अपघाताचे हे वृत्त कळताच भुसावळ येथून आत्पत्कालिन गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. या गाडीने वरीष्ठ परीचलन प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्यासह विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तीन तास युद्धपातळीवर काम करून अपघातग्रस्त एसएलआर बोगी रुळांवरून बाजूला केली. मंगळवारी दुपारी 1.10 वाजता अपघातग्रस्त एसएलआर डबा रुळांवर ठेऊन गाडीपासून वेगळा करण्यात आल्यानंतर गीतांजली एक्स्प्रेस अकोला स्थानकावर आली. येथे संपूर्ण गाडीची तपासणी करून दुपारी 3.30 वाजता ही गाडी अकोला येथून भुसावळकडे रवाना झाली. गाडीने वरीष्ठ परीचलन प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्यासह विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तीन तास युद्धपातळीवर काम करून अपघातग्रस्त एसएलआर बोगी रुळांवरून बाजूला केली.