गीत रामायणावर आधारित अनोखा कार्यक्रम

0

पुणे । गीतकार ग.दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेल्या ‘गीत रामायण’ या कलाकृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रमेश देव प्रॉडक्शन व सुबक यांनी ‘नृत्य-सजीव गीत रामायण’ या कार्यक्रमाच्या निर्मिती केली आहे. येत्या 30 सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी ‘नृत्य-सजीव गीत रामायणाचा नेत्रदीपक सोहळा मुंबईत रंगणार आहे. ‘नृत्य-सजीव गीत रामायण’ आजच्या पिढीला निश्चितच भावेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिनयव अभिनेता अजिंक्य देव यांनी व्यक्त केला. मराठीतील हे सांस्कृतिक वैभव रसिकांसमोर आले पाहिजे. या उद्देशाने कलाकृतीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.

कथ्थक नृत्याचे सादरीकरण
सोनिया परचुरे आणि शरयू नृत्य कलामंदिरचे शिष्य ‘कथक’ या शास्त्रीय नृत्यप्रकाराच्या आधारे ते सादर करतील. अजित परब, हृषीकेश रानडे, विभावरी आपटे, शमिका भिडे हे यासाठी गाणार असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. अतुल परचुरे या सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत.