गुंगीचे औषध देत तरुणीचा दोन लाखात सौदा : आरोपीने केला अत्याचार : आठ जणांविरोधात गुन्हा

रावेर : तालुक्यातील पाल येथील एका 25 वर्षीय युवतीला नास्त्यात गुंगीचे औषध देवून दोन लाखात मध्य प्रदेशातील एका तरुणाला विक्री करण्यात आले व नंतर विवाह लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जबरदस्तीने तरुणीवर अत्याचार
13 जुलै 2021 ते 12 जून 2022 च्या दरम्यान पाल, ता.रावेर येथील एका 25 वर्षीय तरुणीला दोन अनोळखी महिलांनी नास्त्यात गुंगीचे औषध देवून तिला मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील घाटपीपल्या येथील राकेश वर्मा (30) याला दोन लाखात विक्री केले व जबरजस्तीने विवाह लावून दिला. नंतर पीडीतेवर राकेशने लैंगिक अत्याचार केला तर पीडीतीची सासु शामू वर्मा, सासरे भगीरत वर्मा, दिर कमल वर्मा, दिर दिनेश वर्मा, नणंद तेजू यांनी संगममताने पीडीतला डांबून ठेवूण मारहाण केली. याबाबत पीडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्य प्रदेश येथील वर्मा कुटुंबासह दोन अनोळखी महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे तपास करीत आहे.