गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0

कल्याण : ऑफिसमध्ये काम करणार्या 17 वर्षीय मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चंद्रशेखर पडीयाची याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. पीडित 17 वर्षीय मुलगी ही आंबिवली येथे राहत असून कल्याण पूर्वेकडील मेट्रो टॉवरमध्ये राहणार्या चंद्रशेखर पडीयाची यांच्याकडे काम करते. रविवारी दुपारच्या सुमारास चंद्रशेखर यांनी या मुलीला मटन आणण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. तेथे कोणत्यातरी ज्यूसमधून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिला एका इमारतीमधील खोली साफसफाई करण्यास सांगितले. पीडित तरुणीला चक्कर आल्याने ती बेडरूममध्ये बसली असताना ही संधी साधत चंद्रशेखर पडीयाची याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

आरोपीला अटक
कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात पीडित तरुणी राहत असून शुक्रवारी ती घरात झोपली असताना तिचा नातेवाईक तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे