गुंडाकडून पिस्तुल जप्त

0

भोसरी : पोलिसांनी सराईत गुन्हेगार भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा. त्रिवेणीनगर, निगडी) याला अटक केली आहे.  त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजारांचा माल जप्त केला.  कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एक तरुण संशयितरित्या उभा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  अंगझडतीत त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल सापडले.