गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष, 141 जणांची 4 कोटीत फसवणूक

0

हरिणाया येथील फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीच्या पाच जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा

जळगाव- हरियाणा येथील फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीत पैशांची गुंतवणूक केली मात्र गुतवणुकीचा फायदा न मिळता 141 जणांची 4 कोटी 29 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला असून याप्रकरणी कंपनीच्या पाच जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बळीरामपेठेत प्रशांत छगन पाटील यांना विनोद निळकंठ पाटील व स्वामी रमेश जाधव या दोघांनी हरियाणा येथील फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीबद्दल माहिती दिली. 2 लाख 2 हजार 500 रुपये जमा केल्यास कंपनी चे प्रोडक्ट घरपोच करुन आपण कंपनीत जमा केलेल्या पैशांवर 24 महिन्यांत 10 टक्के टीडीएस कपात करुन 29 हजार 250 रुपये खात्यावर जमा होतील अशी माहिती दिली. व कंपनी साखळी पध्दतीने काम करत असून तुम्हाला पुढील संपूर्ण आयुष्यभर कंपनीच्या टर्नओव्हरवर 7 हजार रुपये अधिक रक्कम मिळेल असे सांगितले. आम्ही यात 14 लाख रुपये टाकल्याचे सांगितले. त्यानुसार प्रशांत पाटील यांनी योजनेत 2 लाख 2 हजार 500 रुपये जमा केले.

नफा झाल्याने खात्री अन् आणखी गुंतवणूक
37 दिवसानंतर पाटील यांचे पत्नी हिच्या खात्यावर 17 हजार 550 रुपये जमा झाले. याासेबत नफा म्हणून 7 हजार रुपये मिळाले. नफा मिळाल्याने पाटील यांची खात्री झाली. यानंतर त्यांनी आणखी 29 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर पाटील यांना कुठलाही नफा किंवा परतावा मिळाला नाही. त्यांनी कंपनीत पैसे जमा करणार्‍यास सांगणार्‍या विनोद पाटील व स्वाती जाधव यांची भेट घेतली. मात्र दोघांचीही फसवणूक झाल्याचे म्हणाले. यात विनोद पाटील यांच्या साखळीतील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांची 2 कोटी रुपयात फसवूणक झाल्याचे समोर आले. अशाप्रकारे एकूण प्रशांत पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यातील 140 जणांची 4 कोटी 29 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाली आहे.

या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत सोमवारी प्रशांत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन राधेशाम नाथुराम सुतार, तहसील आदमपूर, जि. हिंसार, हरियाणा, बन्सीलाल सिहाब तहसील भुना जि.फतेहबाद, हरियाणा, सुनंरसिंग सैनी, फतेहबाद, प्रविण केशव कदम रा.निंबुडा पो.दाभाडी, ता.सटाणा, जि.नाशिक, रविंद्र खैरनार अशोक नगर, सातपुर नाशिक या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.