गुंतवणूक परत मिळण्यासाठी महिलांची चाळीसगाव पोलिसांकडे धाव

0

चाळीसगाव । रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमीटेड व सीट्स चेक ईन्स लिमीटेड कंपनी च्या मालेगाव शाखेत भरलेले पैसे परत मिळावेत अशी मागणी कंपनीच्या जिल्हा विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्यासह गुंतवणुकदार महीलांनी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी केली आहे. 350 हुन अधिक बिझीनेस असोसिएटस व 650 हुन अधिक सभासदांचे 2 कोटी रुपये मिळवून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहा वर्षात भरणा
कंपनीत 2010 पासुन ते मे 2016 पर्यंत वंदना माळतकर, माधवी कुलकर्णी यांनी 350 हुन अधिक बिसनेस असोसिएट ची टीम तयार करुन कंपनीचे ओमप्रकाश गोयंका, प्रकाश उतेकर, व्यंकटरामन नटराजन, नारायण कोटणीस, उमेश वर्तक, जितुभाई देसाई यांनी त्यांना विश्‍वासात घेवुन त्यांची फसवणुक केली. तक्रारदार महीलांनी जवळपास 550 हुन अधीक सभासदांकडुन पैसे जमा करुन वरील कंपनीच्या मालेगाव येथील शाखेत चेक व रोखीने 2 कोटी रुपये वेळोवेळी 6 वर्षात भरणा केला त्यावेळी शाखेतील मुख्य अधिकारी वर्गाने त्यांना विश्‍वासात घेऊन भरणा रकमेची हमी देऊन गुंतवणुक वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कंपनी सोडून पसार
पैसा भरल्यानंतर सभासदांचा पैसा परतावा घेण्याची वेळ आली तेव्हा मालेगाव शाखेतील सर्व अधिकारी, कर्मचारी कंपनी सोडुन निघुन गेले त्यामुळे त्यांना मुंबई शाखेत जावे लागते. आम्ही वारंवार मागणी केल्यानंतर कंपनीचे चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर श्री गोयंका यांनी ओव्हरड्यु डिपॉझीटर्सचे पैसे ताबडतोब परत देण्याची लेखी आश्‍वासन देऊनही परत दिले नाही. पैसे भरणारे वयोवृद्ध, सेवानिवृत्त, कष्टकरी कामगार, महीला यांना न्याय द्यावा तसेच कंपनीने गेल्या काही वर्षांचा एजंट च्या कमीशन मधुन कापलेला 780 कोटीचा टी डी एस शासनाकडे जमा केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असुन वरील सर्व डायरेक्टर व अधिकारी अंदाजे 8 हजार कोटी 14 लाख सभासदांचे हडप करुन भारताबाहेर पळुन जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे 21 मार्च 2017 रोजी मोठे सिनीयर व डायरेक्टर यांच्या खात्यात पैसे जमा होवुनही सभासदांना पैसे मिळाले नाहीत.

कारवाईची मागणी
कंपनीच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी वरीष्ठ स्तरावर करण्यात आल्या असून तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या कार्यालयाकडे गोयंका यांनी आम्हा सभासदांचे पैसे देण्याचे लेखी दिले असताना त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तरी आपण कारवाई करुन आमच्या निवेदनावर झोनल मॅनेजर वंदना माळतकर, माधवी कुलकर्णी व उषा सूर्यवंशी, सुपडाबाई सूर्यवंशी, बेबाबाई म्हस्के, निला शिंपी, शिवाजी सैंदाणे, वैशाली शिंगटे, आशा सूर्यवंशी, आदी महीलांच्या सह्या आहेत.