गुगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक; सुंदर पिचईंची मोठी घोषणा

0

नवी दिल्ली: आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काही वेळातच सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी सांगितले आहे.

“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असे ट्विट पिचई यांनी केले आहे.