गुगल मॅप्सद्वारे पोहोचता येणार अवकाशातील प्रयोगशाळेपर्यंत

0

कॅलिफोर्निया : गुगल मॅप्सने प्रथमच नवीन स्ट्रीट व्ह्यू सुविधा उपलब्ध करून दिली असून सर्व लोकांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रापर्यंत (आयएसएस) पोहोचता येणार आहे. त्यांना कक्षेमधील आयएसएस प्रयोगशाळेतील अंतराळवीरांनी काढलेले फोटो पाहून आयएसएसचा फिल घेता येणार आहे.

जवळ जवळ १६ वर्षे खगोलशास्त्रज्ञ पृथ्वीपासून ४०० किलो मीटर उंचीवर असलेल्या आयएसएसमध्ये काम करीत आहेत. तेथून अवकाशाचे अवलोकन ते करतात. चंद्र, मंगळ आणि उल्कांचा अभ्यास या आयएसएसरूपी प्रयोगशाळेमधून होत आहे. त्याने पृथ्वीबद्दल वेगळा दृष्टीकोन या आयएसएस देते. थॉमस पेस्क्वेट हे युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर आहेत. त्यांनी फ्लाईट इंजिनीयर म्हणून अवकाशात सहा महिने काढलेत. त्यांनी गुगलसाठी काम केले. आयएसएस आतून कसे दिसते ते स्ट्रीट व्ह्यू मधून त्यांनी फोटो काढले. त्याचप्रमाणे वरून पृथ्वी कशी भासते त्याचेही चित्रण केले. अवकाशातून महासागर, वातावरण, पृथ्वीचा पृष्ठभागाविषयीची माहिती गोळा करता येते. गुरूत्वाकर्षणाचा आणि शरीराचा संबंध, रोगप्रतिकारक शक्ती, चक्रीवादळांचा अभ्यास आदींशी संबंधित प्रयोग आयएसएसद्वारे करता येतात, असे पेस्क्वेट सांगतात. मानवावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींबाबत त्यांना सावध करता येते याकडेही ते लक्ष वेधतात.