अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी समाप्त झाली. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 14 डिसेंबररोजी मतदान होणार आहे. दुसर्या आणि शेवटच्या टप्प्यात गुजरातमधील 14 जिल्ह्यातील 93 विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
9 डिसेंबररोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत 89 जागांसाठी मतदान पार पडले आहे. दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 851 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, 2.22 कोटी मतदार मतदान करणार आहेत. दुसर्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसने जोरदार प्रचार केला. नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सी-प्लेनने प्रवास करत अंबाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व प्रचाराला सुरूवात केली. तर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.