गुजरातचा हरियाणाशी सामना

0

हैदराबाद। प्रो लीग कबड्डीमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघाने स्पर्धेत एकदा विजयी ठरलेल्या यु मुंबाला चांगलेच सतावले होते. काशिनाथ आडकेच्या सुपर रेडरमुळे यु मुंबाला हरियाणा स्टीलर्सविरुद्ध विजय मिळवता आला होता. दादा संघाला झुंजवणार्‍या हरियाणा स्टीलर्सचा बुधवारी त्यांच्याप्रमाणे लीगमध्ये नवीन असलेल्या गुजरात फॉर्च्युन जायट्स संघाशी सामना होणार आहे.

यु मुंबाविरुद्धच्या लढतीमुळे हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे. त्यामुळे गुजरात फॉर्च्युनजायटंस विरुद्धच्या सामन्यात त्यांचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे.सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर असे दोन भक्कम कोपरारक्शक हरियाणा स्टीलर्सकडे असल्यामुळे यु मुंबाला गुण मिळवताना कठिण गेले होते. लीगमधील इतर संघांनाही या दोघांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

गुजरातकडे असलेली कर्णधार सुकेश हेगडे, अमित राठी आणि महेंद्र राजपूत ही आक्रमकांची फळी हरियाणाचा बचाव कसा भेदते हे बघायला दोन्ही संघाचे चाहते उत्सुक असतील. गुजरातच्या बचावाची सारी मदार इराणच्या अबझोर मिघानी, फझेल अत्राचळी आणि मनोजकुमारवर असेल. दुसरीकडे हरियाणा स्टीलर्सच्या आक्रमणाची जबाबदारी कर्णधार सुरेंदर नाडावर असेल.

लीगमधील ब गटात तेलगु टायटन्स आणि बेंगॉल वॉरियर्स यांच्यात सामना होईल. पाचव्या सत्रात धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर यजमान तेलगु टायटन्सला नंतर मात्र गाडी रुळावरुन व्यवस्थित नेता आलेली नाही. यंदाच्या सत्रात बेंगॉल वॉरियर्समध्ये आलेल्या मणिंदर सिंग दाखल झाल्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. तेलुगु टायटन्सला गुणतालिकेतील पिछाडी भरुन काढायची असल्यामुळे या दोन संघामधील लढत तुल्यबळ होऊन कबड्डीप्रेमींना चांगला खेळ बघायला