अहमदाबाद-गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपामध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.