भुसावळ : गुजरातसह हिमाचल राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलल्यानंतर भुसावळातील स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी सोमवारी दुपारी फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ तसेच आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली. प्रसंगी पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.