गुजरातमधील डॉक्टरांकडून महिला सहकाऱ्यावर बलात्कार

0

राजकोट: सरकारी निवासी रुग्णालयातील डॉक्टराने आपल्याच कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी राजकोट पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. सचिन संतोष कुमार सिंग असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

२४ वर्षीय पीडित महिलासुद्धा त्याच रुग्णालयात निवासी डॉक्टर होत्या. ३० ऑगस्ट रोजी डॉक्टरने त्यांच्यावर अतिप्रसंग करुन याप्रकरणी कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. सदर महिलेने याबाबतची तक्रार महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे केली असता, त्यांनी आरोपींचे निलंबन करुन कारवाई केली होती.

सदर प्रकरणाने भयभीत झालेल्या पीडित महिलेने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली नव्हती. मागच्या आठवड्यात तिने पोलीस आयुक्त मनोज अगरवाल यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. आयुक्तांनी तिची समजूत घातल्यानंतर २१ सप्टेंबररोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.