नवापूर: शहरात अधुन मधुन अनपेक्षीत घडामोडी घडत असुन एका प्राध्यापकांने माजी विद्यार्थीनीचा केलेल्या विनयभंगानंतर नगरसेवकाला गुजरातमध्ये अटक झाल्याने चर्चेला उधान येत खळबळ उडाली आहे.
गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उकाई पोलीसांनी नवापूर शहरातील अपक्ष नगरसेवक विशाल केशव सांगळेसह दोन जणांना महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात दारू बंदी असताना कार मध्ये दारू घेऊन जात असताना पोलिसांनी दारु तस्करी प्रकरणी कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली आहे.
तापी जिल्ह्यातील उकाई पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सफेद रंगाच्या आय २० कार क्रमांक एम एच ३९व्ही ३९९९ मध्ये अवैधरित्या भारतीय बनावटची इंग्लिश दारूची तस्करी करत असताना गुजरातच्या तापी जिल्ह्यातील गुणसदा नवागाव फळ्या नजीक गुजरात पोलिसांनी कारवाई आहे.कार मध्ये दारूचे स्टिन ४८ दारू नग एकूण किंमत १४ हजार ४००, कारची किंमत तीन लाख रूपये, तिघांना कडील तीन मोबाईल ३८ हजार असा एकूण तीन लाख ५२ हजार ४०० रूपयाचा मुद्देमाल गुजरात राज्यातील उकई पोलीसांनी जप्त केला आहे.
गुजरात राज्यातील पोलिसांनी दानियल साक-या गामीत वय २८ रा फुलवाडी तालुका उच्छल जिल्हा तापी (गुजरात), किसन अजय मेहता वय २७ रा शिवाजी रोड,दत्त मंदिर परिसर नवापूर तसेच नवापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष नगरसेवक विशाल केशव सांगळे वय ३१,रा जनता पार्क नवापूर यांच्या विरोधात कलम ६५ ई,९८(२)८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तिघांना गुजरात राज्यातील उकाई पोलीसांनी अटक केली आहे.
नवापूर शहरातील नगरसेवक दारू तस्करीचा संदर्भात गुन्हा दाखल झाल्याने नगरसेवकाला गुजरात पोलिसांनी अटक केल्याप्रकरणी नगर पालिका राजकीय गोटात भुकंप झाला आहे.विशाल सांगळे सह तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. महाराष्ट्रातील गुजरात व महाराष्ट्र सीमेवरील नवापूर शहरातुन गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर दारुतस्करी होत असते. गुजरात मधील दारूबंदी असताना दारू तस्करीला मोठे आर्थिक सप्लाय मिळत असल्याचे बोलले जात आहे. काही राजकीय छत्राने हा व्यवसाय राजेरोजपणे सुरु आहे राजकीय कवच त्याला मिळत असते. अनेक वेळा नवापूरातून गुजरात मध्ये दारु जात असतांना तस्करी उघड झाली आहे.
विशाल सांगळे अपक्ष नगरसेवक असताना प्रभागातील विकास कामे, जनसंपर्क मोठा असल्याने त्यांना दारू तस्करीत फसवण्यात आल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.