गुजरातमध्ये धुमाकूळ घालणार्‍या अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

Accused who made a splash in Gujarat by committing robberies and murders in the net of crime branch जळगाव : गुजरात राज्यात खूनासह दरोडे टाकून धुमाकूळ घालणार्‍या व पारोळा पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टमध्ये वॉण्टेड गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायपूर कुसुंबा येथून अटक केली. आरोपीला अधिक कारवाईसाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुनील उर्फ सल्या लक्ष्मण पाटील (35, बालाजी शाळेजवळ, अशोक नगर, अमळनेर रोड, पारोळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पारोळा पोलिस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
पारोळा पोलीस ठाण्यात आरोपी सुनील पाटील विरोधात भादंवि 399 व आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्याचा शोध सुरू होता मात्र आरोपी गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. संशयीत आरोपी कुविख्यात असल्याने त्याच्याविरोधात तक्रार देण्यासही कुणी धजावत नव्हते. आरोपी गुजरात राज्यात खुनासह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. अट्टल गुन्हेगार सुनील उर्फ सल्या लक्ष्मण पाटील हा जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंह पाटील, महेश महाजन, भगवान पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, परेश महाजन प्रशांत ठाकूर यांनी संशयीत आरोपीला शनिवारी दुपारी अटक केली. आरोपील पुढील कारवाईसाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.