गुजरातमध्ये पुराचा कहर!

0

गांधीनगर : सौराष्ट्रनंतर आता उत्तर गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. बनासकाठामधील धानेरा शहर पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहे. सोमवारी रात्री पावसातच 25 हजार लोकांना सरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे.

उत्तर गुजरातला पावसाचा विशेष फटका बसला असून, तेथील एक हजार लोकांना वाचवून 15 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. दरम्यान, प्रशासनाने अतिवृष्टीमुळे 100 गावे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे मृत झालेल्यांची संख्या 70 वर पोहोचली आहे.