अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात पुन्हा एक सेक्स सीडीकांड उघडकीस आले. पाटीदार नेता हार्दिक पटेल हा एका युवतीसोबत अश्लील अवस्थेत या सीडीमध्ये दिसत आहे. कालच त्याच्या संदर्भातील एक सीडी बाहेर आली होती. त्यात हार्दिक एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करताना दिसत होता. आता दुसरी सीडी चव्हाट्यावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, भाजप घाणेरडे राजकारण करत असून, आपण मर्द आहोत; जे काही करायचे आहे ते छाती ठोकपणे करेल, असे हार्दिक पटेल याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जे करायचे ते छाती ठोकपणे करेल!
मंगळवारी चव्हाट्यावर आलेले सेक्स सीडीमध्ये हार्दिक पटेल व त्याचे दोन मित्र एका युवतीसोबत एकांतात दिसत असून, ही युवती हार्दिकसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. या सीडीमध्ये जे मित्र दिसतात त्यापैकी एक ब्रिजेश पटेल हा एक असून, तो हार्दिक पटेल याचा जवळचा साथीदार मानला जातो. हा व्हिडिओदेखील खोटारडा असल्याचा दावा हार्दिक पटेल याने केलेला आहे. भाजप घाणेरडे राजकारण करत असून, त्यांच्या या राजकारणाला घाबरणार नाही. तसेच, गुजरातची जनतादेखील हे सर्व ओळखून आहे, असे हार्दिक याने सांगितले. आपण नपुंसक नाही, जे काही करायचे आहे ते छाती ठोकपणे करू, असेही त्याने भाजपला ठणकावले. दरम्यान, या सीडीकांडावरून काँग्रेसनेदेखील भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
मोदींना लगाविला टोला
अचानक चव्हाट्यावर येणार्या व्हिडिओंबाबत आपण 18 नोव्हेंबरलाच खुलासा करू, असा इशारा हार्दिक पटेल याने दिला आहे. यापूर्वी सोमवारी हार्दिक पटेल याची एक सेक्ससीडीही चव्हाट्यावर आली होती. त्यात तो एका तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असल्याचे दिसून येत होता. ज्या लोकांनी संजय जोशी यांचीही सीडी बनविली होती, तेच लोकं आता आपलीही सीडी बनवित आहेत, असा टोला लगावित हार्दिक पटेल याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले.