गुजरातला पाणी जात असल्याचे आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईल:गिरीश महाजन

0

मुंबई : महाराष्ट्रातील पाणी गुजरातला जात आहे असा आरोप वारंवार होत असतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नांदेड येथील सभेत हे आरोप केले. दरम्यान राज ठाकरे यांनी हे आरोप सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असे खुले आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंनी केलेले आरोप फेटावून लावले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच नांदेडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी राज्यातील भाजपा सरकारने महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिल्याचा आरोप केला होता.

दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेतात
‘नुसतं बोलून चालणार नाही, तर स्वत:चे कर्तृव्य सिद्ध करुन दाखवले पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या. क्लिप दाखवायच्या, तोडून-मोडून मोदींच्या काहीतरी आणि दोन शब्द बोलायचे, असे करण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेण्यापेक्षा आपली माणसे निवडून आणून दाखवा.’ अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.