गुजरातवर मात करत मुंबई पोहोचली अव्वलस्थानी

0

मुंबई। मुंबई इंडियन्सनी आपल्या घरच्या मैदानात गुजरात लायन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यामध्ये गुजरातने 176/4 अशी धावसंख्या उभारली. पण 19.2 षटकांमध्ये मुंबईने हे लक्ष्य पार केले. या विजयासह आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. नितीश राणा आणि कायरन पोलार्डने केलेल्या घणाघाताच्या जोरावर मुंबईने गुजरात लायन्सवर सहा गडी राखून मात करत यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सोबतच पाच सामन्यातील चार विजय आणि 8 गुणांसह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान
पटकावले आहे.

मुंबईची सुरुवात झाली होती खराब
100 धावा होण्याआधीच मुंबईचे तीन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. गुजरातने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल पहिल्याच षटकात बाद झाला. पण फॉर्ममध्ये असलेल्या नितीश राणाने (53) जोस बटलरच्या (26) साथीने 85 धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयाची पायाभरणी केली. पण राणा आणि बटलर पाठोपाठ बाद झाल्याने सामन्यात रंगत आली. त्यानंतर पोलार्डने फटकेबाजी करून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेर पोलार्ड 39 धावा काढून झाला. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने गुजरातला चमत्काराची कोणतीही संधी न देता मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी नितिश राणा आणि जॉस बटलरने चांगली खेळी करत इंडियन्सचा डाव सावरला. नितिश राणाने अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्याच षटकात मॅकक्लेनाघनने ड्वेन स्मिथची विकेट काढत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ब्रँडन मॅक्युलम (64) आणि कर्णधार सुरेश रैना (28) यांनी दुसर्‍या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी करत गुजरातला सावरले. पण रैना आणि मॅक्युलम ठराविक अंतराने बाद झाल्याने गुजरातचा डाव पुन्हा अडचणीत आला. त्यानंतर मॅकलमची भूमिका दिनेश कार्तिकने बजावत गुजरातला चांगल्या स्कोअरपर्यंत नेलं. मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने आज एक जमेची बाब म्हणजे मॅच त्यांच्या होमपीचवर होती. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होत असल्याने घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा विजय मिळवण्याची संधी मुंबई इंडियन्सना होती. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं मात्र 26 चेंडूत48 धावा कुटणार्‍या दिनेश कार्तिकने गुजरातला 20 षटकात 4 बाद 176 धावांपर्यंत मजल मारून दिली.