चाळीसगाव-तालुक्यात मोठा गाजावाजा करीत एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली गेली याचा आनंद तालुक्यासह खडकी बुद्रुक येथील एमआयडीसीला जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना देखील झाला आपल्या पाल्याना रोजगार मिळेल याची आस लागली मात्र नोकरी तर सोडा नवीन दुर्गंधी ने गावकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे गुजराथ मका फॅक्टरी तुन असह्य घाणेरडा दुर्गंध सुटला असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आज या संतप्त ग्रामस्थांनी गुजरात अंबुजा कंपनीच्या व्यवस्थापकाला गेल्या दोन महिन्यांपासून येणाऱ्या दुर्गंधी वास बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
कंपनीतुन येणाऱ्या घाण दुर्गंधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून काहींना श्वसनाचे विकारांचा त्रास होतो आहे,लहान मुले आजारी पडत आहे व गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील पाणी सुध्दा दूषित होत आहे.या घाण दुर्गंधी वासामुळे ग्रामस्थांना गावात राहणे असह्य झाले आहे तरी कंपनी व्यवस्थापकाने ताबडतोब दुर्गंधीयुक्त वासाचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थ सदर कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे निवेदन देताना मनाजी तांबे,सुजित गायकवाड, गोकुळ कोल्हे,नाना तांबे,विनायक मांडोळे,बापु मांडोळे,कैलास कोल्हे,रमेश तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.निवेदनाच्या प्रति राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,आरोग्यमंत्री,पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंत्री,विरोधीपक्ष नेता, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार आहे हवा असली की हा दुर्गंध एमआयडीसी परिसरातील शहर हद्दीतील काही प्रभागांमध्ये देखील येत चर्चा असल्याचे शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे .