ठाणे : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांत मनसेने महाराष्ट्राची ब्लू प्रिंट दाखवली होती. मात्र, भाजप गुजरात निवडणुकीमध्ये ब्लू फिल्म दाखवून प्रचार करत आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
ठाण्यातील सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या राहुल गांधींना पप्पू समजता तर मग भाजपच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली? सरकारडून महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.