गुजरात मध्ये मोठा घोटाळा

0

अहमदाबाद: काही दिवसांपासून पीएनबीचा घोटाळा खूप चर्चेत होता आता या घोटाळ्यालाही मागे टाकले आहे एका नव्या घोटाळ्याने. ३ अब्ज डॉलर इतक्या महाकाय रकमेइतका घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. हा घोटाळा बिटकॉइनशी संबधीत असल्याचे सांगितले जात आहे. या घोटाळ्यात राजकीय नेते, व्यावसायिक आणि पोलिसांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे.

असे सांगितले जात आहे की, फेब्रुवारी महिन्यात प्रॉपर्टी डेव्हलपर शैलेश भट्ट हे गुजरातच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी दावा केला की, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण करून २०० कोटींची खंडणी मागितली. तसेच, खंडणीची ही रक्कम बिटकॉईनच्या रूपात द्यावे असेही त्यांनी सांगितले. ज्याची रक्कम सुमारे १.८ अब्ज रूपये (सुमारे ९ कोटी रूपये) इतकी होते.

शैलेश यांचा दावा गृह्य धरून त्यातील सत्यता पडताळण्यासाठी हे प्रकरण गृह विभागाने राज्याच्या सीआईडीकडे सोपवले. आशीष भाटीया यांच्या नेतृत्वाखाली एक समितीही बनली. प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासादरम्यान, संशय व्यक्त करण्यात आला की, भट्ट यांच्या अपहरणाचा बनाव त्यांचाच सहकारी किरीट पलडियानेच रचला होता. पलडियाचे काका आणि भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया हे सुद्धा या कटात सहभाही होते.