गुजरात राज्यात स्थलांतर करणार्‍या कुटूंबांना मार्गदर्शन

0

डामरखेड येथील २० कुटूंबाचा स्थलांतर न करण्याचा निर्णय

शहादा । तालुक्यातील डामरखेडा येथे स्थलांतर रोखण्यासाठी उद्बोधन मेळावा घेण्यात आला. डामरखेडा येथे जि. प. शाळा डामरखेडा येथे भवानी मातेच्या प्रांगणात मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यास पं. स. शहादा प्रकाशा बिटाचे विस्तार अधिकारी अध्यक्ष म्हणून एम.आर.निकम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशा केंद्राचे केंद्र प्रमुख एन.एन.अहिरे ,शहादा तालुका भिलिस्थान टायगर सेनेचे रविंद्र ठाकरे, उपसरपंच वासुदेव पाटील,तंटामुक्तीचे विलास भिला पाटील, सोमा शेमळे उपस्थित होते.

गावात राहून रोजगार कसा मिळेल याबाबत निकम यांची माहिती
दर वर्षी गावात स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. साधारण ४० कुटुंब रोजगारासाठी गुजरात राज्यात जाण्याच्या तयारीत होते. यापार्श्‍वभूमींवर हा मेळावा महत्वपूर्ण होता. या उद्बोधन मेळाव्यास विस्तार अधिकारी निकम यांनी शासनस्तरावरील स्थलांतरित रोखण्यासाठी असलेल्या योजनांबाबत आणि शैक्षणिक योजनासंदर्भात माहिती दिली. आदीवासी समाजातील डॉ. राजेंद्र भारुडकर याचे उदाहरण देऊन शैक्षणिक प्रगती करु शकतो हा विश्वास निकमांनी पटवून दिला. केंद्रप्रमुख एन. एन. अहिरे यांनी गावात राहून रोजगार कसा मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन करीत डामरखेडा गावातील गुजर समाजातील लोक शैक्षणिक क्रांती मुले अमेरिकेत गेले याचे उदाहरण देऊन उपस्थितांचे मन जिंकली. गुजरात स्थलांतराणे मोठे नुकसान होते हे पटवून दिले. हंगामी वसतिगृह संदर्भात विवेचन केले. विद्यार्थी हमीपत्राबाबत मार्गदर्शन केले. रविभाऊ ठाकरे यांनी आपल्या बोली भाषेत लोकांना गुजरात न जाण्याचा सल्ला दिला. शैक्षणिक क्रांतीमुळे माणसे प्रगत होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्गाचा बाहेर बसून शिकले चटके सहन केले पुढे जाऊन भारतीय संविधान लिहिले. येथील आदिवासी ,बौद्ध ,बहुजन भटक्या जाती जमातीला सन्मानाने उभे रहाण्याचे बळ दिले याचे स्मरण रवी भाऊने केले. हे विचार ऐकून ४० कुटुंब पैकी २० कुटुंबाने गुजरात न जाण्याचा संकल्प बोलून दाखविला. याकामी जिप शाळा डामरखेडा येथील मुख्याध्यापक राठोल,श्री बेडसे ,श्री लोहार, भारती देवरे, देसले यांनी नियोजन केले.